काँग्रेसची मान्यता रद्द करण्याची स्वामींची याचिका फेटाळली

November 6, 2012 2:27 PM0 commentsViews:

06 नोव्हेंबर

काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे. काँग्रेस पक्षानं नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राला 90 कोटींचं कर्ज दिलं होतं. पण कुठलाही राजकीय पक्ष अशाप्रकारे कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसची मान्यता रद्द करावी, अशी याचिका जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं असेल तरच आयोग कारवाई करू शकतं. पण स्वामी ते सिद्ध करू शकले नाही असं आयोगानं म्हटलंय. यावर स्वामींनी तीव्र प्रतिक्रिया दिली. याचिका फेटाळण्याआधी आयोगानं सुनावणी घ्यायला हवी होती. आता आपण कोर्टात जाऊ असं स्वामींनी म्हटलंय.

close