ओबामा -रोमनींची आता खरी परीक्षा

November 2, 2012 5:07 PM0 commentsViews: 7

02 नोव्हेंबर

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षापदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. अमेरिकेतल्या 50 राज्यांपैकी काही राज्यं ही मतदानामध्ये निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांवर बराक ओबामा आणि मिट रोमनी यांचं भवितव्य ठरणार आहे. 6 नोव्हेंबरला मतदानाची शेवटची तारीख आहे. पण त्याआधी मतदानाची प्रक्रिया आधीच सुरू झालीय. शिकागोमध्ये बराक ओबामा यांनी काही दिवसांपूर्वी मतदान केलं. असं मतदान करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ठरलेले मतदार आहेत. पण ज्यांचं या दोन्ही पक्षांपैकी कुणाला मत द्यायचं हे ठरलेलं नाही, असे अन डिसायडेड मतदार ज्या राज्यात आहेत. ती राज्यं निकाल फिरवू शकतात. जो ओहायो स्टेट जिंकेल तो राष्ट्राध्यक्ष होईल, असं बोललं जातंय. राष्ट्रपती बनण्यासाठी उमेदवाराला 270 मतं मिळाली पाहिजे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ओबामांनी आपले प्रतिस्पर्धी मिट रोमनी याच्यावर आघाडी घेतलीय. त्यामुळं 6 तारखेच्या मतदानाकडे आता सगळ्यांचं लक्षं लागलंय.

महत्त्वाची राज्यं

ओहायोव्हर्जिनियाआयोवाविस्किन्सिनफ्लोरिडामिशिगनपेनिसेल्वेनियानॉर्थ कैरोलीना

close