आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा :शिवसेना

November 8, 2012 8:19 AM0 commentsViews: 7

08 नोव्हेंबर

आदिवासी विभागात झालेल्या 1 हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. या घोटाळ्यामुळे देशात महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे. कोर्टाने ताशेरे ओढूनही मुख्यमंत्री त्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुचना द्याव्यात अशी मागणी या शिष्टमंडळानं केली आहे. त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

close