इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी युवी,भज्जीचं कमबॅक

November 5, 2012 11:29 AM0 commentsViews: 4

05 नोव्हेंबर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी 15 खेळाडूंची नावं आज जाहीर करण्यात आली. भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगनं टेस्ट टीममध्ये कमबॅक केलंय. युवराजनं दुलिप करंडक स्पर्धेत डबल सेंच्युरी आणि इंग्लंडविरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये ऑलराऊंड कामगिरी करत टेस्ट क्रिकेटसाठी आपण फिट असल्याचं दाखवून दिलं होतं. तर गेले काही महिने खराब फॉर्मशी झगडणार्‍या हरभजन सिंगनंही टीममध्ये कमबॅक केलं आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत सेंच्युरी करणार्‍या मुंबईकर अजिंक्य रहाणेनंही टीममध्ये जागा पटकावली आहे. इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट येत्या 15 नोव्हेंबरपासून अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज नव्या भारतीय निवड समितीनं भारतीय टेस्ट टीमची घोषणा केली आहे.

अशी असेल भारतीय टीम

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, युवराज सिंग, एम एस धोणी, आर अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, ईशांत शर्मा, झहीर खान आणि उमेश यादव

close