शेतकर्‍यांना दिवाळी भेट, 11 नोव्हेंबरपासून कापूस खरेदी

November 6, 2012 2:45 PM0 commentsViews: 61

06 नोव्हेंबर

कापूस उत्पादकांना सरकारने दिवाळीची खास भेट दिली आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून राज्य सरकार कापूस खरेदी करणार आहे. केंद्र सरकारनं यंदा कापसाला 3 हजार 900 प्रती क्विंटल इतकी आधारभूत किंमत जाहीर केली आहे. तीच किंमत पणन महासंघाकडून शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. 109 केंद्रांवर ही कापूस खरेदी होणार आहे. गेल्या दोन हंगामात राज्य सरकारनं शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकार कापूस खरेदी करणार आहे ही त्यातल्या त्यात शेतकर्‍यांना दिलासा देणारी बाब आहे. 11 नोव्हेंबरला वर्ध्यात पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

close