अल-कुबेरमधून दहशतवादी मुंबईत आले

December 2, 2008 8:12 AM0 commentsViews: 11

2 डिसेंबर मुंबईदहशतवादी समुद्रमार्गे ज्या बोटीनं आले ती बोट मुंबईत भाऊच्या धक्क्यावर नजरबंद करण्यात आली आहे. अल-कुबेर नावाची ही बोट गुजरात मार्गे मुंबईत आली. गुजरातच्या एका व्यापा-याची ही बोट असून दहशतवाद्यांनी ही बोट हायजॅक केली होती. ह्या बोटीवर तिरंगा झेंडा, हनुमानाचं चित्र असलेला भगवा झेंडा आणि एका पांढ-या झेंड्यावर गुजराती देवतांची नावे लिहिली आहेत. त्यामुळेच यात दहशतवादी असतील असा कुणालाही संशय आला नाही.शिवाय ह्या बोटीवर जास्त दिवस काढता यावेत म्हणून जेवणाची आणि पाण्याची सोयही करण्यात आली होती. ही बोट नेहमी याच मार्गे मुंबईत येत असते. त्यामुळे नेहमीची बोट म्हणून ह्या बोटीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि याचा फायदा घेत दहशतवादी मुंबईत शिरले.

close