मधुर भांडारकरांना दिलासा; प्रिती जैननं खटला घेतला मागे

November 5, 2012 12:15 PM0 commentsViews: 21

05 नोव्हेंबर

मॉडेल-अभिनेत्री प्रिती जैन बलात्कार प्रकरणी दिग्दर्शक मधुर भांडारकरला दिलासा मिळालाय. हा खटला सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. पोलिसांनी फक्त प्रिती जैन यांची बाजू ऐकली, माझं म्हणणं पोलिसांनी ऐकलं नाही, असा दावा करत मधुर भांडारकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण गेल्या नऊ वर्षांपासून हा खटला सुरू आहे, त्यामुळे यापुढे आपल्याला ही केस न्यायची नाही असं प्रिती जैन यांनी कोर्टाला सांगितलं आहे. प्रिती जैन यांनी जुलै 2004 मध्ये वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये भांडारकर यांच्याविरोधात 16 वेळा बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली होती. तसेच भांडरकर यांनी लग्नाचे आणि चित्रपटात काम देण्याचं आश्वासन दिलं होतं पण नंतर भांडरकर आपल्या आश्वासनावरून मागे फिरले. तपासाअंती पोलिसांनी भांडारकरांविरूध्द करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

close