चोरीच्या संशयावरून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

November 6, 2012 4:07 PM0 commentsViews: 40

06 नोव्हेंबर

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडीत चोरीच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. लाखेवाडीतल्या भवानी देवीच्या यात्रेत काही महिलांची मंगळसूत्रं चोरीला गेली होती. या चोरीच्या संशयावरून सराटी गावच्या देवस्थान पंचसमितीनं या महिलेला ताब्यात घेतलं. आणि झडती घेण्याच्या बहाण्यानं तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

close