गैरव्यवहार प्रकरणी मायावतींना कोर्टाचा दिलासा

November 5, 2012 1:21 PM0 commentsViews: 3

05 नोव्हेंबर

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना अलाहबाद हायकोर्टानं दिलासा दिला आहे. कोर्टाने मायावतींविरोधातली ताज कॉरिडोर संदर्भातली याचिक फेटाळली आहे. 172 कोटींच्या या प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मायावतींवर करण्यात आला होता. याप्रकरणी मायावती आणि तत्कालीन मंत्री नसीमुद्दीन सिद्दिकी यांची चौकशी विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळले होते. कोर्टाच्या या आदेशाविरोधात अलाहबाद हायकोर्टात 7 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण हे प्रकरण आता बंद करण्यात आलंय.

close