काँग्रेसची मान्यता रद्द करण्यात यावी -स्वामी

November 3, 2012 10:11 AM0 commentsViews: 7

03 नोव्हेंबर

काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करा अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी आज निवडणूक आयोगाकडे केली आहे.नॅशनल हेराल्ड डेली चालवणारं ट्रस्ट सोनिया आणि राहुल गांधींनी ताब्यात घेतलं. आणि या व्यवहारात अनेक अनियमितता असल्याचा आरोप स्वामींनी शुक्रवारी केला होता. असोसिएटेड जर्नल्सचं कर्ज फेडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 90 कोटींचं कर्ज दिलं. कुठलाही राजकीय पक्ष अशा प्रकारे कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप स्वामींनी केला होता. स्वामींनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीविरोधात न्यायालयीन लढा देऊ, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेसनं दिलेल्या 90 कोटींचे कर्जाचे पैसे कर्मचार्‍यांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी वापरण्यात आले, असा दावा काँग्रेसनं केला.

close