उसाला 3 हजार रुपये भाव देणं अशक्य -पाटील

November 8, 2012 11:34 AM0 commentsViews: 3

08 नोव्हेंबर

उसाचं आंदोलन दिवसेंदिवस चिघळतं चाललं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी इंदापूरमध्ये सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे. पण 3 हजार रुपये भाव देणं अशक्य असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यावर सरकार जर शेतकर्‍यांशी चर्चा करणार नसेल तर एकाही मंत्र्याला राज्यात दिवाळी साजरी करु दिली जाणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

close