‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पेटवला उसाचा फड

November 5, 2012 1:41 PM0 commentsViews: 5

05 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात उसाचं आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललंय. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बारामती तालुक्यातल्या माळेगावमध्ये माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या शेतातील उसाचा फड आंदोलकांनी पेटवला. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बारामती येथील 'गोविंदबाग' या घरासमोरुन ऊस घेऊन जाणार्‍या चार ते पाच वाहनांच्या टायरची हवा कार्यकर्त्यांनी काढली. तर सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 2100 रुपये जाहीर केला आहे. पण हा दर मान्य नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

close