मुस्लीम संघटनांनी मुंबई हल्ल्याचा निषेध केला

December 2, 2008 2:39 PM0 commentsViews: 3

2 डिसेंबर मुंबईदेशातल्या प्रमुख मुस्लीम संघटनांनी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या दहशतवाद्यांचा मुस्लीम संघटनांशी कुठलाही संबंध नाही.अतिरेक्यांचा हल्ला हा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या विरोधात नव्हता.तर हा हल्ला हिंदुस्थानवर होता. हे कृत्य करणा-या अतिरेक्यांवर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कोणाचीही असं काम करण्याची हिंमत होणार नाही. हे दहशतवादी ज्या देशातून ते आले आहेत त्या देशात फेकून द्या. आणि त्यांना मदत करणा-या देशाला दहशतवादी देश म्हणून घोषित करा.अशी मागणी या संघटनांनी केलीय.4 डिसेंबरला मुंबईत मुस्लीम समाजातर्फे अमन मार्ग या नावानं रॅली काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

close