आरोपांकडे दुर्लक्ष करा, कामाला लागा -गडकरी

November 3, 2012 10:27 AM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

भाजप नेत्यांवर आरोप करण्याचं काम काँग्रेसकडून केलं जातंय.आरोप करणं हे सोपं आहे, पण त्या आरोपांना पुरावे नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांनी न डगमगता काम करावं असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलंय. औरंगाबादमध्ये विमानतळावर आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. नितीन गडकरी हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर जात असताना त्यांनी औरंगाबादमधील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यासाठी थांबले होते. त्यांच्या भेटीला औरंगाबाद आणि जालना जिल्हयातील शेतकरी आणि कार्यकर्ते मोठया संख्येनं आले होते.

close