पक्षानं पंतप्रधान पदापेक्षा खूप काही दिलं -अडवाणी

November 8, 2012 11:51 AM0 commentsViews: 31

08 नोव्हेंबर

पक्षानं आपल्याला सर्व काही दिलं असून पंतप्रधान पदापेक्षा ते मोठं आहे अशी भावना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. लालकृष्ण अडवानी यांचा आज वाढदिवस आहे. अडवानींनी आज वयाची 85 वर्ष पूर्ण केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुष्पगुच्छ पाठवून अडवानींना शुभेच्छा दिल्या. तर भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी अडवानींना त्याच्या निवासस्थानी जावून शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे निवडणुकीजवळ आल्यावर भाजपच्या वतीने लालकृष्ण अडवाणी पंतप्रधानापदाचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू होते. पण यावेळी पंतप्रधानांपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे असल्यामुळे अडवाणींनी पंतप्रधानापदापेक्षा पक्ष मोठा असल्याचं सांगून बाजूला झाले असं दिसतंय. दोन दिवसांपुर्वीच नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या आरोपामुळे दिल्लीत कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. पण या बैठकीत अडवाणी सहभागी झाले नव्हते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला जेष्ठ नेते अडवाणी गैरहजर राहल्यामुळे नाराज असल्याची चर्चेला उधाण आलं होतं.

close