बाल विकास योजनेचा अहवाल मिळालाच नाही -मुख्यमंत्री

November 5, 2012 2:54 PM0 commentsViews: 4

05 नोव्हेंबर

पोषण आहार योजनेतल्या घोटाळ्याबाबतचा अहवाल सरकारला अजून मिळालाच नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या बाल विकास योजनेत 1 हजार कोटींचा घोटाळा समोर आला. पोषण आहार योजनेबाबत सुप्रीम कोर्ट आयुक्तांच्या रिपोर्टमध्ये ही खळबळजनक माहिती समोर आली. पण हा रिपोर्ट अगोदरच फुटला. फुटलेल्या अहवालावर काय प्रतिक्रिया द्यायची, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रकरणातून हात झटकले. तर या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

close