अहमदनगर सेक्स स्कँडल प्रकरणी 7 जणांना जन्मठेप

November 8, 2012 1:32 PM0 commentsViews: 92

08 नोव्हेंबर

अल्पवयीन मुलींना फसवून वाममार्गाला लावल्याप्रकरणी अहमदनगरच्या 7 जणांना जन्मठेपेची तर 8 जणांना सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2006 मध्ये अहमदनगरमध्ये हे प्रकरण उघडकीला आलं होतं. त्यावेळी या प्रकरणातील 20 जणांना नगरच्या जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं यातल्या 7 जणांची जन्मठेप आणि 8 जणांची सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवली आहे. यातला मुख्य आरोपी चेतन भळगट यानं अत्याचारित मुलीशी लग्न केल्यानं त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलाय. नगरच्या स्नेहालय संस्थेच्या पुढाकारानं हे प्रकरण उघडकीला आलं होतं.

close