टीम केजरीवाल आता जैतापूर प्रकल्पाविरोधात लढणार

November 5, 2012 4:14 PM0 commentsViews: 7

05 नोव्हेंबर

टीम केजरीवाल आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात उतरणार आहे. आज इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मयांक गांधी यांनी साखरीनाटेमध्ये जाऊन प्रकल्प विरोधी मच्छिमारांची सभाही घेतली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनात आता आपणही सहभागी होऊ, असं आश्‍वासन दमानिया यांनी प्रकल्प विरोधकांना दिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा जैतापूर प्रकल्प विरोधातलं थंड झालेलं आंदोलन भडकण्याची चिन्हं आहेत. लवकरच प्रकल्पविरोधी आंदोलनाच्या तारखा आयएसीकडून जाहीर होतील असं दमानिया यांनी सांगितलं.

close