अनुदानीत 9 सिलिंडरबाबत आज घोषणा होण्याची शक्यता

November 7, 2012 10:11 AM0 commentsViews: 7

07 नोव्हेंबर

अनुदानीत सिलेंडर गॅसची संख्या 6 वरून 9 वर नेण्याचा विषय बर्‍याच काळापासून प्रलंबित आहे. सरसकट सर्व ग्राहकांना तीन सिलिंडरची सबसिडी देऊ केल्यास राज्याच्या तिजोरीवरती मोठा बोजा पडेल असं राज्य सरकारला वाटत होतं. पण आता ऐन दिवाळीत राज्यसरकार तीन सिलिंडरची सबसिडी द्यायला राजी झालंय. त्यासाठी 1600 कोटी रुपयांचा बोजा सहन करायला अर्थखात्यानं तयारी दाखवल्याचं समजतंय त्यामुळंच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलेंडरचा मुद्दा पुन्हा चर्चेला येणार आहे. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवाठा विभागाकडून मांडला जाण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट देतं का ते पहावं लागेल.

close