तहानलेल्या मराठवाड्याला पाणी द्या -मुंडे

November 10, 2012 10:02 AM0 commentsViews: 11

10 नोव्हेंबर

मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याचं पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांनी अडवून धरलंय. मराठवाड्याला प्यायला पाणी नसताना वरच्या जिल्ह्यांनी पिकांसाठी पाणी अडवून ठेवणं अन्यायकारक आहे. मराठवाड्याला पाणी सोडावं अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.मराठवाड्याचं मुख्य जायकवाडी धरणात अलीकडेच भंडादरा धरणांतून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. पण जायकवाडीत फक्त 1 टीएमसी पाणी पोहचले हा पाणी साठी एक महिना पुरेल इतकाच आहे. यासाठी शिवसेनेनं शेजारील जिल्हातून जादा पाण्याची मागणी केली आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून सेनेकडून आंदोलन होतं आहे.

close