जन्मदात्यानं फेकलं बाळाला उड्डाणपुलावरून खाली

November 8, 2012 1:37 PM0 commentsViews: 5

08 नोव्हेंबर

बायकोशी झालेल्या भांडणामुळे संतापलेल्या नवर्‍यानं आपल्या सात महिन्याच्या बाळाला रेल्वे उड्डाणपुलावरुन फेकून दिल्याची दुर्देवी घटना पिंपरीत घडली आहे. सुदैवानं 40 फुटांवरुन पडल्यानंतरही या दुर्घटनेतून हा लहानगा वाचला आहे. याप्रकरणी आरोपी दत्ता उर्फ युवराज देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बायकोशी वाद झाला तेव्हा दत्ता दारुच्या नशेत होता. पिंपरीच्या रेल्वे उड्डाणपुलावरुन जाताना त्यांचं भांडण विकोपाला गेलं, बघ्यांची गर्दी झाली, वाहतूकही ठप्प झाली. रागाच्या भरात दत्ताने आपला मुलगा शुभमला फेकण्याच्या तयारीत असणार्‍या दत्ताला काहीजणांनी रोखण्याचाही प्रयत्न केला पण त्यांनी शुभमला खाली फेकलं. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद पांढरेंनी पुलाखाली धाव घेत मुलाला ताब्यात घेतलं. संतापलेल्या नागरिकांनी यावेळी दत्ताला भरपूर चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

close