सर्व अतिरेकी पाकिस्तानी – पोलीस कमिशनर हसन गफूर

December 2, 2008 3:20 PM0 commentsViews: 3

2 डिसेंबर, मुंबई' मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे सर्व अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक असून अटक करण्यात आलेला एकमेव अतिरेकी पाकच्या पजांब प्रांतातील आहे. दहशतवाद्यांना स्थानिकांनी मदत केली की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही ' , असं मुंबईचे पोलीस कमिशनर हसन गफूर यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंरच्या रात्रीपासून दहा अतिरेक्यांनी मुंबईला सलग 60 तास वेठीस धरलं होतं. हल्ल्याच्या तपासाबाबत आज पोलीस कमिशनर गफूर यांनी माहिती दिली.'अतिरेक्यांजवळ मुंबईचा नकाशा होता. अतिरेकी आधी मुंबईत आले नव्हते. त्यांना अंदाधंुद गोळीबार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हल्ल्यात कुठलीही महिला सामील नाही ' , अस कमिशनर म्हणाले. पुढे ते म्हणाले, पाच टॅक्सींनी अतिरेकी विविध ठिकाणांवर पोहचले. एका अतिरेक्यांशिवाय कोणालाही अटक झालेली नाही. टॅक्सीमध्ये टाईम बॉम्ब ठेवण्यात आला होता. लिओपोल्ड आणि ताजच्या दरम्यान एका टॅक्सीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. समुद्र मार्गानं अतिरेकी येऊ शकतात, याची गेल्या वर्षी माहिती आली होती. मात्र ती गुजरात आणि दक्षिण भारतातील हल्ल्यासंदर्भातील होती. पाकिस्तानातील मेरियट हॉटेलमधील स्फोटानंतर एक इंटेलिंजस माहिती आली होती.अतिरेक्यांपैकी कुणीही ब्रिटीश नागरिक नाही. सर्व अतिरेकी पाकिस्तानी नागरिक असून त्यांच्याजवळ सॅटेलाईट फोन आणि जीपीएस यंत्रणा मिळाली आहे. पाकिस्तानातील माजी लष्करी अधिकार्‍यांनी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं आहे. पकडण्यात आलेल्या अतिरेक्याजवळ रोख 5 हजार मिळाले तर ठार झालेल्या अतिरेक्यांजवळ परदेशी चलन आणि कॉलेजची बनावट ओळखपत्र मिळून आली '.

close