पंतप्रधानांनी केलं बराक ओबामांचं अभिनंदन

November 7, 2012 10:31 AM0 commentsViews: 3

07 नोव्हेंबर

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी सलग दुसर्‍यांदा बराक ओबामा यांची निवड झाली. ओबामांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. भारतानेही त्यांच्या विजयाचे स्वागत केलं आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संदेश पाठवून बराक ओबामांना शुभेच्छा दिल्या.

आपण दोघे मिळून भारत आणि अमेरिकेची भागिदारी अधिक बलशाली करू आणि जगासमोरच्या समस्यांना तोंड देऊ याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपली मैत्री माझ्यासाठी मौल्यवान आहे आणि ती यापुढे वृध्दींगत होत जाईल अशी मला आशा आहे. मी आणि माझी पत्नी तुम्हाला, मिसेस ओबामांना तसंच मालिया आणि साशा यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला चांगलं आरोग्य, यश आणि आनंद मिळो – पंतप्रधान मनमोहन सिंग

close