धुळ्यात डेंग्यूचा कहर, बळींची संख्या 13 वर

November 10, 2012 11:07 AM0 commentsViews: 9

10 नोव्हेंबर

धुळे जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातलंय. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत तेरा जणांना डेंग्यूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. नागरिकांमध्ये याबद्दल प्रचंड रोष आहे. याबद्दल वकील राजश्री पांडे यांनी औरंगाबाद खंडपीठात राज्य शासन, जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. कोर्टाने ही याचिका मान्य केली असून सोळा नोव्हेंबरला राज्यसरकारला कोर्टाने खुलासा देण्याचे आदेश दिले आहे. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून मात्र डेंग्यूला आवाक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.

close