फौंड्री उद्योगाची बैठक शिवसैनिकांनी उधळली

November 8, 2012 3:26 PM0 commentsViews: 8

08 नोव्हेंबर

कोल्हापुरामधला फौंड्री उद्योग कर्नाटकात जाण्यास शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची आज कर्नाटक राज्यातल्या उद्योग सहसंचालक आणि अधिकार्‍यांशी बैठक होती. 8 दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या 25 फौंड्री उद्योजकांनी कर्नाटक राज्याच्या उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरची चर्चा आजच्या बैठकीत होणार होती. मात्र ही बैठक सुरू होताच त्याठिकाणी अचानक शिवसैनिक घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करत ही बैठकच बंद पाडली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे कोल्हापुरातल्या व्यापार्‍यांनी बैठकीतून पळ काढला. त्यानंतर शिवसैनिकांनी या अधिकार्‍यांना कार्यालयातून हाकलून लावलं. यावेळी काही शिवसैनिकांनी अधिकार्‍यांना धक्काबुकीही केली.

close