राजीनाम्यासाठी गडकरींवर पक्षातूनच वाढता दबाव

November 6, 2012 9:46 AM0 commentsViews: 3

06 नोव्हेंबर

भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणखी अडचणीत आले आहे.अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी गडकरींवर पक्षातूनच दबाव वाढतोय. पण गडकरींबाबतचा कोणताही निर्णय दिवाळीपूर्वी होणार नसल्याचं समजतंय. गडकरींच्या राजीनाम्यासाठी राम आणि महेश जेठमलानींनी उघडला मोर्चा उघडला आहे.

यशवंत सिन्हा, जसवंत सिंग आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केलाय. लालकृष्ण अडवाणी यांना अंतरिम अध्यक्ष करावं असं भाजपमधल्या एका गटाचं मत आहे. पण, या प्रस्तावाला संघाचा पाठिंबा नसल्याचं समजतंय. या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवरच गडकरींनी अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांची भेट घेतली. आपला गडकरींना पाठिंबा नसल्याची मीडियातली चर्चा खोटी असल्याचं सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटलंय. दरम्यान, आज संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात भाजप गडकरींना पाठिंबा देणारं निवेदन काढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संघानेही हात वर केले आहे. या सगळ्या प्रकरणी भाजपनंच निर्णय घ्यावा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलं आहे.

close