मेधा पाटकर यांची मध्यप्रदेशातील तुरूंगातून सुटका

November 7, 2012 11:19 AM0 commentsViews: 11

07 नोव्हेंबर

मध्यप्रदेशातील पेंच प्रकल्पातील पाणी वळवून अदानी पॉवर कंपनीला देण्याच्या विरोधात मेधा पाटकर आणि समर्थकांनी तुरूंगातच उपोषण सुरु केलं होतं. आज दुपारी या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. सरकारच्या पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे 35 गावांतील 300 कुटुंबीयांना याचा फटका बसणार आहे. आणि म्हणूनच या पूर्ण योजनेविरोधात लढा देणार असल्याचा निर्धार मेधा पाटकर यांनी केला आहे.

close