आपल्या वक्तव्याबद्दल गडकरींनी व्यक्त केली दिलगिरी

November 6, 2012 9:59 AM0 commentsViews: 5

26 नोव्हेंबर

स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहीम यांची तुलना केल्याबद्दल नितीन गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे. विवेकानंद यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केलं हे आपल्याला सांगायचं होतं. पण आपलं म्हणणं संदर्भहीन प्रसिद्ध केल्याचा उलट दावा गडकरींनी केला. काल सोमवारी गडकरींनी थेट स्वामी विवेकानंद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचीचं तुलना केली. स्वामी विवेकानंद आणि दाऊदची बुद्धिमत्ता सारखीच होती पण दाऊदनं वाईट कामांसाठी बुद्धीमत्तेचा वापर केला तर स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्रहितासाठी केला अशी तुलना गडकरींनी केली होती. गडकरींच्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. अगोदर पूर्ती ग्रुपमुळे अडचणीत आलेल्या गडकरींनी असं वक्तव्य करून अडचण ओढावून घेतली. अखेरीस आज त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

close