सहाशे कोटींचा ‘झोल’ करणार्‍या ठगाला अटक

November 10, 2012 4:27 PM0 commentsViews: 4

10 नोव्हेंबर

बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 600 कोटींना लोकांना फसवणार्‍या सिद्धार्थ मराठे या ठगाला दिल्लीच्या आर्थिक गुन्हे विभागानं रत्नागिरीत अटक केली आहे. बोगस कंपन्या तयार करून जवळपास 600 कोटींचा अपहार केल्याचा त्याच्याविरुद्ध आरोप आहे. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठे फरार झाला होता. सिध्दार्थ मराठे हा रत्नागिरीच्या उद्यम नगर भागातील रहिवासी आहे. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून त्यानं महाराष्ट्रासह राजस्थान,आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यातल्या अनेकांची फसवणूक केली आहे. मराठेला दिल्लीत लोकेश्वर देव या नावानं ओळखतात. याच तपासात मराठे हा मूळ नागपूरचा उल्हास प्रभाकर खैरे असल्याचीही माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. मराठेला त्याची बायको प्रियांकासह दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. दिल्लीच्या मोतीनगर पोलीस स्टेशनला मराठेविरुध्द गुन्हा दाखल आहे. स्टॉक गुरू या नावानं मराठे उर्फ लोकेश्वर देवनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

close