उद्धव ठाकरेंवर यशस्वी अँजिओप्लास्टी;लीलावतीतून डिस्चार्ज

November 6, 2012 10:10 AM0 commentsViews: 5

06 नोव्हेंबर

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी दुसर्‍यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या जुलै महिन्यात उद्धव यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या रक्तवाहिन्यांमधले तीन ब्लॉकेजेस काढण्यात आले होते. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीमध्ये एक स्टेंट टाकण्यात आलं. यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होईल असा दावा डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांनी केला आहे. यावेळी उद्धव यांच्यासोबत ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते. शनिवारी उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. यावेळी सेनेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे हजर होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सरसंघचालक मोहन भागवत यांनी फोन करून उद्धव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

close