राज्यात सिलेंडरची मर्यादा 6 वरून 9 वर

November 7, 2012 2:09 PM0 commentsViews: 6

07 नोव्हेंबर

अखेर हो नाही म्हणत राज्य सरकारनं अनुदानित गॅस सिलेंडरची मर्यादा 6 वरून 9 करण्याच्या निर्णयाला तत्वत: मान्यता दिली आहे. दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच पिवळ्या कार्ड धारकांना 9 सिलेंडर अनुदानित किमतीनं मिळणार आहेत. तर दारिद्यरेषेवरील पण 1 लाख रुपये उत्पन्न असणार्‍या केशरी कार्ड धारकांनासुद्धा 9 सिलेंडर अनुदानित किमतीनं मिळतील. त्यासाठी राज्य सरकार केशरी कार्ड धारकांना प्रति सिलेंडर साडे तिनशे रुपये अनुदान देणार आहे. पण सरसकट सर्व गॅस ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. त्यासंदर्भात अजूनही मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि नागरी पुरवठा यांच्यासह जेष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. सरसकट सर्व ग्राहकांना दिलासा द्यायचा झाल्यास राज्याच्या तिजोरीवर 24 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत मंत्रिमंडळात मतभेद आहेत.

close