अण्णांचे पुन्हा ‘उपोषणास्त्र’

November 11, 2012 10:06 AM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर

सरकारनं सक्षम लोकपाल विधेयक आणलं नाही तर रामलीला मैदानावर पुन्हा उपोषण करणार असा इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय. तसंच 2014 च्या निवडणुकांच्या आधी हे उपोषण करु असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. आज टीम अण्णांच्या नवीन ऑफिसचं दिल्लीत उद्घाटन झालंय. त्यानंतर अण्णा पत्रकारांशी बोलत होते. भ्रष्टाचारविरोधात अण्णांच्या आंदोलनाची आता नव्यानं सुरुवात झालीय. दिल्लीतल्या सर्वोदय एन्क्लेव्हमध्ये आज टीम अण्णांच्या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे. अण्णांनी काल आपल्या नव्या टीमची नवी दिल्लीत घोषणा केली. या नव्या टीममध्ये 15 सदस्य आहेत. त्यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली. अण्णा 30 नोव्हेंबरपासून देशभरात दौरा सुरू करणार आहेत.

close