केजरीवाल-बाबा रामदेवांविरोधातील याचिका फेटाळली

November 8, 2012 5:55 PM0 commentsViews: 3

08 नोव्हेंबर

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल आणि बाबा रामदेव यांच्याविरोधातल्या याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. खासदारांना बलात्कारी आणि खुनी म्हटल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करावेत अशी मागणी याचिकांमध्ये करण्यात आली होती. त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधातली याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेतलं जावं असं वक्तव्य प्रशांत भूषण यांनी केलं होतं. त्यावरून बराच वादही झाला होता. केजरीवाल उद्या दुपारी पुन्हा एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते कुणाचा भ्रष्टाचार उघड करतात, याबाबत आता उत्सुकता लागून आहे.

close