स्वीस बँकेत 700 भारतीयांचा काळा पैसा -केजरीवाल

November 9, 2012 10:07 AM0 commentsViews: 18

09 नोव्हेंबर

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज काळ्यापैशाच्या मुद्दावरून भारतीय उद्योजकांवर एकच हल्लाबोल केला. एचएसबीसी बँकेच्या जिनिव्हातल्या शाखेत 700 भारतीयांचा तब्बल 6 हजार कोटी रुपये पैसा आहे आणि यामध्ये अंबानी बंधू, गोयल, बर्मन, बिर्ला यांची खाती असल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. स्वीस बँकेत मोटेक सॉफ्टवेअर या रिलायन्स ग्रुप कंपनीचे 2100 कोटी रुपये जमा आहे. यामुळे जिनिव्हात खाती असलेल्या लोकांच्या मालमत्तांवर छापे टाकावेत आणि दोषी आढळल्यास या सर्वांना अटक करावी या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली. तसेच HSBC बँक भारतात उघडपणे हवाला रॅकेट चालवतं आहे. या बँकेत एसबीआयपेक्षा स्वीस बँकेत खातं उघडणं सोपं आहे. आणि विशेष म्हणजे एचएसबीसीच्या दुबई आणि जिनिव्हा शाखांसाठी आरबीआयचं लायसन्स नाही. मग यांची खाती त्या बँकेत कसं काय ? भारत सरकारच्या मदतीनेच हवाला रॅकेट चाललंय जातंय असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

स्वीस बँकेत काळा पैसा?

- मुकेश अंबानी- 100 कोटी- अनिल अंबानी- 100 कोटी- मोटेक सॉफ्टवेअर लि.( रिलायन्स ग्रुपमधील कंपनी)- 2100 कोटी- रिलायन्स इंडस्ट्रिज- 500 कोटी- संदीप टंडन- 125 कोटी- अनु टंडन- 125 कोटी- नरेश गोयल- 80 कोटी- बर्मन्स (कुटुंबातील 3 सदस्य)- 25 कोटी- यशोवर्धन बिर्ला- बँकेत खातं पण बॅलन्स नाही

केजरीवाल यांचा मागण्या

- प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रींग ऍक्टनुसार HSBC बँकेच्या अधिकार्‍यांना तात्काळ अटक करावी- त्यांच्यावर देशद्रोह आणि देशावर युद्ध लादण्याचा गुन्हा का दाखल होऊ नये ?- HSBC बँकेचे भारतातले व्यवहार ताबडतोब थांबवावेत- HSBC बँकेला जिनिव्हा शाखेतल्या भारतीयांच्या गेल्या 10 वर्षांतल्या बँक खात्यांचा तपशील द्यायला सरकारनं सांगावं- अंबानी बंधू, नरेश गोयल, बर्मन आणि बिर्लांसह यादीतल्या 700 लोकांच्या मालमत्तांवर छापे टाकावेत – त्यांना बँकेतल्या सर्व व्यवहारांचा तपशील सादर करायला सांगावं- या सर्व लोकांविरुद्ध वेगवेगळ्या कायद्यांखाली कारवाई करावी- हवालामार्फत परदेशात पैसा पाठवल्याचं उघड झाल्यास त्यांना अटक करावी

close