खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा मोर्चा

November 7, 2012 3:22 PM0 commentsViews: 4

07 नोव्हेंबर

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरसह सातारा, सांगली, सोलापूर, सिंधूदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी करत वकिलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तसंच या आंदोलनामुळं गेले 3 दिवस 6 जिल्ह्यातलं संपूर्ण न्यायालयीन कामकाज ठप्प झालं आहे.

close