सहा डिसेंबरपुर्वीच इंदू मिलची जागा स्मारकासाठी देणार -मुख्यमंत्री

November 11, 2012 10:45 AM0 commentsViews: 14

11 नोव्हेंबर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याबाबत 6 डिसेंबरपूर्वी निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी आनंदराज आंबेडकर यांनी मागिल वर्षी आंदोलन छेडले होते. सहा डिसेंबरला हजारो भिमसैनिकांनी इंदू मिलचा ताबा घेऊन संपूर्ण जागा स्मारकासाठी द्या अशी मागणी लावून धरली.

या आंदोलनानंतर राज्यभरात रिपाइं,भारिपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली होती. राज्य सरकारने आंदोलनची दखल घेत वस्त्र मंत्रालयाला इंदू मिल जमीन देण्याबाबत प्रस्ताव धाडला होता. वस्त्र खात्यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही संपूर्ण जागा स्मारकासाठी देण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. तर दुसरीकडे मागिल महिन्यातच रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी येत्या सहा डिसेंबरच्या आता स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्यात यावी अन्यथा मिल ताब्यात घेऊ असा इशारा दिला होता. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलबाबत घोषणा केली.

close