‘राज-उद्धव एकत्र आल्यास महायुतीचा फेरविचार करावा लागेल’

November 11, 2012 11:02 AM0 commentsViews: 6

11 नोव्हेंबर

आमच्या महायुतीमध्ये चौथ्या भागीदाराची गरज नाही. भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपल्याला महायुतीबाबत वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिला. ते सोलापूरमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी मनसेनं महायुतीसोबत यावं असं वक्तव्य भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. आठवलेंनी याअगोदरही औरंगाबादमध्ये महायुतीत असा बदल झाल्यास महायुतीचा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. आठवलेंच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

close