ठाण्यात 10 किलो भेसळयुक्त मावा जप्त

November 9, 2012 11:49 AM0 commentsViews: 94

09 नोव्हेंबर

दिवाळीनिमित्त अन्न आणि औषध प्रशासनाचं धाडसत्र सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात टाकलेल्या धाडीत शिळा आणि भेसळयुक्त असा 12 लाख रूपये किमतीचा 10, 181 किलो मावा प्रशासनानं जप्त केला आहे. मिठाईच्या मागणीत वाढ झाल्याने जप्त केलेल्या या माव्यामध्ये मैदा, खाद्यतेल आणि दूध पावडर याचा वापर करण्यात आला होता. हा दुषित मावा ठाण्यातील मीरा रोड, कल्याण, भाईंदर याठिकाणी दिवाळीनिमित्त मिठाई तयार करण्यासाठी वापरात येणार होता. अन्न औषध प्रशासन मिठाईच्या दर्जाची तपासणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.

close