पुलोत्सवात भरली अनोखी शाळा

November 7, 2012 1:17 PM0 commentsViews:

07 नोव्हेंबर

पुलोत्सवात आज एक अनोखी शाळा भरली..अर्थातच, शाळेतला हा स्पेशल वर्ग होता ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहतांचा..पुण्यातल्या फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये विजयाबाईंनी अभिनयाचा क्लास घेतला. 3 तास चाललेल्या या क्लासमधे नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, दीपा लागू, ज्योती सुभाष या बाईंच्या हुशार जुन्या विद्यार्थ्यांसोबत नवोदित तरूणही उत्साहानं सहभागी झाले होते. दिलेल्या चार वाक्यांमधून वेगवेगळ्या सिच्युएशन्स तयार करायची परीक्षा होती. नव्या पिढीतले कलाकार ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करत होते आणि विजयाबाई त्यांचा परफॉर्मन्स झाला की त्यांना सुचना करत होत्या… अभिनयाची बाराखडी गिरवायला सुरुवात केलेल्यापासून ते विजयाबाईंबरोबर अनेक वर्षांपासून काम करणार्‍या प्रत्येकासाठीच हा क्लास म्हणजे एक रिफ्रेशमेंट करणारा अनुभव ठरला.

close