..तर ‘स्वाभिमानी’कडून नुकसान भरपाई वसूल करू -गृहमंत्री

November 11, 2012 12:44 PM0 commentsViews: 8

11 नोव्हेंबर

उसाला सरकारनं 3 हजार रुपये भाव न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानीच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनाचा समाचार घेतं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. हिंसक आंदोलन केल्यास कडक कारवाई करुन नुकसान भरपाई वसूल केली जाईल असा इशारा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिला आहे. तसंच आंदोलनकर्त्यांनी कारखानदारांशी चर्चा करुन उसाचे भाव ठरवावे असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलंय. गेल्याकाही दिवसांपासून स्वाभिमानीने ऊस दरवाढीसाठी आंदोलन छेडले आहे. उसाच्या गाड्यांचे टायर पंक्चर करणे, उसाच्या गाड्या कारखान्यात जाण्यापासून रस्त्यातच अडवल्या जातं आहे. कोणत्याही साखर कारखानदार आणि मंत्र्यांना दिवाळी साजरी करु देणार नाही असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला होता. याचीच दखल घेत गृहमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

close