नवी मुंबईच्या उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे अशोक गावडे

November 9, 2012 11:52 AM0 commentsViews: 5

09 नोव्हेंबर

नवी मुंबई उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांची निवड झाली आहे. त्यांना 59 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुरेखा पाटील यांना 17 मतं मिळाली. तर नवीमुंबई महापौरपदाची पुढची निवडणूक होईपर्यंत सागर नाईक महापौरपदाची सूत्र सांभाळणार आहे. त्याआधी उमेदवारीसाठी अर्ज भरलेल्या चारही उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आल्यानं महापौरपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली. सगळ्यांचे उमेदवारी अर्ज जात वैधता प्रमाणपत्र दिलं नसल्यानं रद्द करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान महापौर सागर नाईक, काँग्रेसचे अमित पाटील, शिवसेनेचे सतीश रामाणे, मनोज हळदणकर यांचे अर्ज रद्द करण्यात आले.

close