पुण्यात मोकाट श्वानांसाठी ‘डॉग शेल्टर’

November 7, 2012 3:21 PM0 commentsViews: 2

07 नोव्हेंबर

पुणे शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. शहरात सध्या 40 हजारांहून जास्त भटके कुत्रे आहेत. दिवसाला एका कुत्र्यामागे 50 ते 60 रूपये खर्च अपेक्षित आहे. स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयावर अंदाजे 123 कोटी रूपये खर्च येणार आहे. एकीकडे निधीच्या कमतरतेमुळे पालिका शहरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यात अपयशी पडतेय. मग महानगरपालिका कुत्र्यांवर करणार असलेल्या कोट्यावधी रूपयाच्या खर्चाचा निर्णय योग्य आहे का ? यावर सध्या मतभेद आहेत.

close