अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांकडून मायावतींना भोजनाचं निमंत्रण

November 11, 2012 12:58 PM0 commentsViews: 6

11 नोव्हेंबर

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी मायावती यांना भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून विविध विषयांवर सरकारची कोंडी होऊ शकते. आणि ही शक्यता गृहीत धरून पंतप्रधानांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. अधिवेशनादरम्यान सरकार अडचणीत आल्यास लोकसभेत बहुमतासाठी विविध पक्षांचा पाठिंबा मिळवणे हाच या भेटींमागचा हेतू आहे.

close