पेट्रोल 95 पैशांनी स्वस्त

November 15, 2012 1:44 PM0 commentsViews: 6

15 नोव्हेंबर

महागाईच्या आगीत होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा दिला आहे. आता पेट्रोलच्या दरात लिटरमागे 95 पैशांची कपात करण्यात आली आहे. ही कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवसात सतत पेट्रोलचे दर वाढत असताना आज 95 पैशांनी पेट्रोलचे दर कमी झाल्यानं किंचितसा दिलासा मिळाला आहे. या कपातीमुळे मुंबईत आता पेट्रोल 73 रुपये 53 पैसे, दिल्ली 67 रुपये 53 पैसे, चेन्नई 70 रुपये 57 पैसे कोलकातामध्ये 74 रुपये 55 पैसे, हैदराबादमध्ये 73 रुपये 73 पैसे आणि बंगलोरमध्ये 74 रुपये 22 पैसे प्रति लिटर दराने मिळणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमतीत घटल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

close