उसाच्या दरवाढीसाठी आता शिवसेनाही रस्त्यावर

November 9, 2012 12:37 PM0 commentsViews: 4

09 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आता शिवसेनेनंही ऊस दराच्या आंदोलनात उडी घेतली आहे. कोल्हापुरात आज शिवसेनेनं राष्ट्रीय महामार्ग रोखत उसाच्या दराची मागणी केली. पहिली उचल 3 हजार रुपये मिळाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. आमदार सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. दरम्यान, शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर पोलिसांनी या सर्वांना ताब्यातही घेतलं. तर या रास्ता रोकोमुळं राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक 2 तास ठप्प झाली होती.

close