पेस-स्टेपनिकची विजयी सलामी

November 7, 2012 4:26 PM0 commentsViews: 1

07 नोव्हेंबर

लंडनमध्ये सुरु असलेल्या एटीपी वर्ल्ड टूर टेनिस फायनल्समध्ये लिएंडर पेस आणि रॅडेक स्टेपनेक जोडीनं विजयी सलामी दिली. पुरुष डबल्समध्ये पेस-स्टेपनेक जोडीनं ऐसान अल-हक कुरेशी आणि जिन ज्युलिअन जोडीचा पराभव केला. पहिला सेट पेस-स्टेपनेक जोडीनं 6-4 असा सहज जिंकला. पण दुसर्‍या सेटमध्ये कुरेशी-ज्युलिअन जोडीनं चांगली लढत दिली. पण त्यांचं हे आव्हान परतवून लावत पेस-स्टेपनिक जोडीनं दुसरा सेट 7-5 असा जिंकला आणि मॅचही खिशात घातली.

भूपती -बोपन्ना जोडीचा पराभव

पण भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपन्ना जोडीला मात्र ग्रुपच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. जोनाथन मरे आणि फ्रेडरिक नेल्सन जोडीनं त्यांचा पराभव केला. पण ही मॅच जबरदस्त चुरशीची झाली. एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत पदार्पण करणार्‍या भूपती-बोपन्ना जोडीला 6-4, 7-6 आणि 10-12 असा पराभव पत्करावा लागला. ही मॅच तब्बल 76 मिनिटं रंगली. आता सेमीफायनल गाठण्यासाठी भूपती-बोपन्ना जोडीला ग्रुपमधल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत

close