गांधी कुटुंबीयांना मिळालेल्या भूखंडावर उभारला मॉल

November 11, 2012 2:25 PM0 commentsViews: 43

11 नोव्हेंबर

गांधी कुटुंबाशी संबंधित असोसिएट जर्नल्स कंपनी आणखी एका नवीन वादात अडकली आहे.दिल्ली, लखनौ आणि मुंबईनंतर भोपळमध्ये असोसिएट जर्नल्सवर नवा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीला सवलतीच्या दरात देण्यात आलेल्या जागेवर भोपाळमध्ये मोठा मॉल उभा राहिल्यानं मध्यप्रदेश सरकार ही जागा परत घेण्याचा विचार करत आहे. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. 1981 मध्ये असोसिएट जर्नल्स कंपनीला तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांनी सवलतीच्या दरात 56 हजार स्केअरफूट जागा दिली होती. पण त्यानंतर हा करार संपला आणि त्याच्या एक वर्षानंतर मार्च 2012 मध्ये भोपळ निकास प्राधिकरणानं हा करार रद्द केला. पण आता ही जागा काँग्रेसचे माजी मंत्री तनवंसिंग कीर यांना विकण्यात आल्याचं सांगत काँग्रेसनं आपले हात झटकले आहेत. ही जागा अजूनही कीर यांच्या वारसांच्या ताब्यात आहे.

close