भारताचं पारडं जड;पहिल्या दिवशी 323 रन्स

November 15, 2012 3:09 PM0 commentsViews: 8

15 नोव्हेंबर

भारताच्या क्रिकेट हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे भारत आणि इंग्लंडदरम्यानची पहिली टेस्ट मॅच आज अहमदाबादमध्ये सुरु झाली. पहिला दिवस गाजवला तो भारताच्या बॅट्समननं. अहमदाबाद टेस्टमध्ये भारतासाठी सुरुवात मनासारखी झाली. कॅप्टन धोणी टॉस का बॉस ठरला आणि भारतानं पहिली बॅटिंग घेतली.

गेल्या काही टेस्ट मॅचमध्ये अपयशी ठरणारे गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही भारताची ओपनिंग जोडी नव्या सुरुवातीसाठी मैदानावर उतरली. गंभीर सेहवागनं पहिल्या विकेटसाठी 134 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. यानंतर गंभीर 45 रन्सवर आऊट झाला. पण सेहवागनं शानदार सेंच्युरी ठोकली. सचिन तेंडुलकरनं सुरुवात चांगली केली. दोन फोर मारत त्यानं 13 रन्स केले. पण सचिन फार काळ मैदानावर टीकला नाही. स्वाननं सचिनची विकेट घेत भारताला तिसरा धक्का दिला. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीलाही स्वाननं पॅव्हेलिअन रस्ता दाखवला. एकिकडे झटपट विकेट जात असताना दुसर्‍या बाजूला चेतेश्वर पूजारानं मात्र संयमी बॅटिंग करत भारताचा स्कोर हलता ठेवला. पुजारा आपल्या दुसर्‍या टेस्ट सेंच्युरीपासून केवळ 2 रन्स पिछाडीवर आहे. तर तब्बल एक वर्षानी टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक करणार्‍या युवराज सिंगनंही पुजाराला चांगली साथ देत पहिला दिवस खेळून काढला. पहिल्या दिवसअखेर भारतानं 4 विकेट गमावत 323 रन्स केले आहे.

सेहवागनं दोन वर्षांनी ठोकली सेंच्युरी

भारताचा धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवागला अखेर सुर गवसला आहे. अहमदाबाद टेस्टमध्ये सेहवागनं धडाकेबाज सेंच्युरी ठोकत आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलंय. ओपनिंगला आलेल्या सेहवागनं सुरुवातीपासूनच आक्रमक बॅटिंग करत इंग्लीश बॉलर्सवर हल्ला केला. अवघ्या 90 बॉलमध्ये त्यानं आपली सेंच्युरी पूर्ण केली. यात 15 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. टेस्ट कारकिर्दीतली ही त्याची तेवीसवी सेंच्युरी ठरली. विशेष म्हणजे सेहवागला ही सेंच्युरी करण्यासाठी तब्बल 2 वर्ष आणि 30 इनिंग वाट पहावी लागली. नोव्हेंबर 2010 मध्ये त्यानं आपली शेवटची सेंच्युरी केली होती. ही सेंच्युरी सेहवागसाठी आणखी एका कारणासाठी महत्वाची ठरली आहे. सेहवागनं भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलंय. भारतातर्फे सर्वाधिक सेंच्युरी करणार्‍या बॅट्समच्या यादीत सेहवाग आता चौथ्या क्रमांकावर आहे.भारताचे सेंच्युरीवीर

बॅट्समन___________सेंच्युरीसचिन तेंडुलकर_________51राहुल द्रविड___________36 सुनील गावसकर_________34वीरेंद्र सेहवाग__________23मोहम्मद अझरुद्दीन_______22

close