अझरूद्दीनवरील आजीवन क्रिकेटबंदी उठवली

November 8, 2012 9:36 AM0 commentsViews: 6

08 नोव्हेंबर

भारतचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनवर घालण्यात आलेली आजीवन क्रिकेटबंदी आंध्रप्रदेश हायकोर्टाने उठवली आहे. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर अझरला आजीवन क्रिकेटबंदी दिली गेली होती. पण ही क्रिकेटबंदी अयोग्य असल्याचं मत कोर्टाने व्यक्त करत ही बंदी उठवली आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात बीसीसीआय कोर्टात जाईपर्यंत ही बंदी नसेल असं अझरुद्दीनच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. 2000 साली मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयनं अझरवर ही आजीवन क्रिकेटबंदी घातली होती. अझरनं पत्रकार परिषद घेऊन कोर्टाचे आभार मानले आहे. जे झालं ते झालं आणि आता तरुणांसाठी आपल्याला बरंच करायचं आहे अशी इच्छा अझरनं व्यक्त केली. इतकचं नाही तर बोर्डाविरुद्ध आपण जाणार नाही आणि जर संधी मिळाली तर बोर्डाबरोबर काम करायलाही आवडेल असंही आज अझहरनं स्पष्ट केलंय.

close