विजय पांढरेंचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे

November 9, 2012 1:11 PM0 commentsViews: 3

09 नोव्हेंबर

मेरीचे कार्यकारी अभियंता विजय पांढरे यांनी त्यांच्या स्वेच्छानिवृत्ती अर्ज मागे घेतला आहे. राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेनं विनंती केल्यानंतर त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरला विजय पांढरे यांनी माझ्या स्वातंत्र्यावर गदा आणला जात आहे त्यामुळे स्वेच्छानिवृती घेत आहे. आपल्यावर थेट दबाव नाही. पण आपल्यावर आणि आपल्या कामावर सतत लक्ष ठेवलं जात असल्याचं सांगत स्वच्छेनिवृत्तीची घोषणा केली होती. पांढरे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मेरीच्या महासंचालकामार्फत राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यातही आला होता. विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

close